पंचायत समितीच्या कै. विनायकराव पाटील सभागृहात घेण्यात आलेल्या या शिबिरास गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी न्यायाधीश एन.एस.काळे यांनी न्यायालयीन कामकाजात मध्यस्थीची महत्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केले. शिबिरात वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ सोपान पवार यांनी लोकसंख्यावाढीच्यादृष्टीने नियत्रंण करण्याची गरज असून यासाठी सर्वोत्परिने विचार करण्याची वेळ आहे. 'हम दो हमारा एक असा विचार' कुटुंबातील व्यक्तींनी करणं महत्त्वाचं असल्याचे प्रतिपादन केले. अँड. राजेंद्र सिरसाठ यांनी संविधानाने दिलेल्या कर्तव्याची माहिती दिली. अँड ज्योती शिंदे कापसे यांनी महिला सक्षमीकरण विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी न्यायालयीन कर्मचारी ए. डी. साळवे यांच्यासह ग्रामीण भागातील महिलांची संख्या उल्लेखनीय होती
0 Comments