news today, वैजापूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

वैजापूर, ता.29 - वैजापूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा सोमवारी (ता.29) सकाळी अकरा वाजता पालिकेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.

नवनिर्वाचित नगरसेविका संगीता राजपूत यांचे स्वागत व सत्कार करताना मुख्याधिकारी भागवत बिघोत व्यासपीठावर नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील सेठ, राजूसिंग राजपूत ...

सुरुवातीला नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ .दिनेश परदेशी व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, छञपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.

पालिकेच्या प्रांगणात रांगोळी काढून सनई चौघडाच्या मधुर आवाजात आयोजित या पदग्रहण सोहळ्यात नगरपालिकेचे  मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी व त्यांचे सर्व नगरसेवक तसेच शिवसेना पक्षाचे माजी नगराध्यक्ष साबेर खान व त्यांच्या पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत केले व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार केला.

या पदग्रहण सोहळ्यास वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, माजी जिल्हा परिषद सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकीलसेठ,  व्यापारी संघटनेचे काशिनाथ गायकवाड, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कंगले, उद्योगपती उमेश वाळेकर, सचिन वाणी, प्रकाश चव्हाण, पंकज ठोंबरे, कैलासराव पवार, राजूसिंग राजपूत, ज्ञानेश्वर जगताप, सुरेश तांबे, विजय दायमा, कुलदीप राजपूत, सावन राजपूत, शैलेश पोंदे, दामोदर पारीक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments