मैमुनाबेगम अमजदखान यांचे वृद्धापकाळाने निधन
वैजापूर, ता.31- वैजापूर येथील ज्येष्ठ नागरिक मैमुनाबेगम अमजद खान (वय 100 वर्ष) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (ता.30) निधन झाले. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक साबेरखान अमजदखान व ज्येष्ठ पत्रकार जफर खान यांच्या त्या मातोश्री होत.
अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून त्या ओळखल्या जात. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
शहरातील नौगजी बाबा दर्गा परिसरातील कब्रस्थानमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेना नेते तथा माजी मंत्री चंद्रकांत खैरे, आ.रमेश पाटील बोरनारे, नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, माजी नगराध्यक्ष राजू सिंग राजपूत, नगरसेवक विशाल संचेती, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकीलसेठ, माजी जिल्हा परिषद सभापती ॲड. प्रमोददादा जगताप, भगवाननाना तांबे, दलीत मित्र डॉ.व्ही.जी. शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मेजर सुभाष संचेती, पी.जी. पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
0 Comments