वैजापूर ता.26 - राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यावतीने धर्मरक्षणार्थ शहीद झालेले गुरू गोविंदसिंहजीं यांची चार छोटी बालके (पुत्र) बाबा साहिबजादा अजितसिंगजी, जुझारसिंगजी, जोरावरसिंगजी आणि फतेहसिंहजी यांच्या स्मरणार्थ देश पातळीवर शुक्रवारी (ता.26) बालक दिन साजरा करण्यात आला. वैजापूर येथील गुरुद्वारातही या वीर बालकांच्या स्मरणार्थ शहिद गीत, प्रार्थना, लंगर प्रसाद वाटप व अभिवादन करुन सम्पन्न झाला.
या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत व नवनिर्वाचित नगरसेवक यांनीही गुरुद्वारात येऊन या वीर बालकांच्या स्मृतींना अभिवादन केले. या प्रसंगी गुरुद्वारात गुरू ग्यानसिंग पोथीवाल, गुरूंदीपसिंग सब्बरवाल, दलजीतसिंग खनिजो, चरणजीतसिंग खनिजो, प्रीतीताई खनिजो, शोभा खनिजो,कवर्षा खनिजो, सन्मित खनिजो, ग्यानिजी गुरूंदीपसिंग, सुरजित कौर, सुलोचना पंजाबी, सरिता आहुजा, अमरप्रित आहुजा, पद्मा आहुजा यांच्यासह महिला मोठयासंख्येने उपस्थित होत्या. गुरुद्वारा बाहेर गोरगरीब व दिव्यांग यांना लंगर भोजन देण्यात आले.
श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या शहादतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैजापूर शहरातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वीर बाल दिवस हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दक्षिण मंडळाचे अध्यक्ष संदीप ठोंबरे, जिल्हा संयोजक प्रेम राजपूत, शहर संयोजक सनमीतसिंग खानिजो, डॉक्टर अश्विन जोशी,
दिनेश राजपूत, नगरसेवकवराजेश गायकवाड, शैलेश पोंदे, गिरीश चापानेरकर,विशाल टेके, दादासाहेब मापारी, किरण खरोटे, सोमनाथ त्रिभुवन, कैलास त्रिभुवन व सिख बांधव - भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
0 Comments