वैजापूर ता.26 - ख्रिसमसनिमित्त वैजापूर येथील करुणा माता
रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये रेव्हरन फादर संजय ब्राह्मणे व जी. एस.पारखे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.25) प्रभू येशू जन्म, सामूहिक प्रार्थना, उपस्थितांना प्रभू येशू यांचा संदेश व मिठाई वाटप करून उत्साहात ख्रिसमस उत्सव सम्पन्न झाला, दुर्गावाडी येथील चर्च मध्येही विविध कार्यक्रमाने ख्रिसमस साजरा करण्यात. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांच्यासह ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेव्हरन फादर संजय ब्राह्मणे, धोंडीराम राजपूत, मार्गारेट तारीका ईक्का व ईतर
चर्च व चर्चच्या प्रांगणात प्रभू येशू यांच्या जीवनातील अनेक प्रसंग दृश्य रूपात दाखविण्यात आले होते. ओरिसा राज्यातून आलेले ब्रदर प्रवीण राणासिंग यांनी हे सर्व दृश्य -देखावे सजविले होते. या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक राजेश गायकवाड व दिनेश ढाकरे यांचा फादर संजय ब्राम्हणे यांनी सत्कार केला. अरुण शिंदे, मार्गारेट डीब्रेटो, तारीका इक्का, संदीप वाघ, साठे यांच्यासह बरेच बंधू व भगिनी या उत्सवात सहभागी झाले होते.
आपद्ग्रस्त, व वीट भट्टी महिला कामगार यांना साडी चोळी वाटप
प्रभू येशू ख्रिस्त यांनी दीन दुबळे, गोरगरीबासाठी केलेली सेवा व संदेशीत केलेला मानवता धर्म याची जाण ठेवत व सामाजिक बांधिलकी जपत ख्रिसमस दिनी गुरुवारी (ता.25) नदीकाठच्या पूरग्रस्त व आपदग्रस्त महिला व वीट भट्टीवर कार्यरत महिला कामगार व मुलींना येथील शिव-फुले-शाहू-आंबेडकर समिती, तसेच जिवाजी महाले प्रतिष्ठाण, यशश्री फोटो, सायकलिंग ग्रुप व समाजकार्यकर्ते यांच्याकडून जमा झालेल्या साडी-चोळी वाटप करण्यात आल्या. तेंव्हा या महिलांच्या चेंहऱ्यावर एकीकडे आसू तर दुसरीकडे हसू स्पष्टपणे दिसत होते.
पुष्पां सोनवणे, अर्जुन करांकाल, शंकर खैरनार, दिलीप अनर्थे, सोपान सोनवणे, बी.के.म्हस्के, मालतीबाई, लता पवार, रणजित मथुरिया, सुनंदा राजपूत, पोपट घोडके, एच पी गॅस, श्री रामदास यांनी या साड्या दिल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत व जगन गायकवाड यांनी महिलांना संबोधित केले.या प्रसंगी आबासाहेब जेजुरकर, अण्णासाहेब ठेंगडे, जगन गायकवाड, दिलीप अनर्थे, राजेश गायकवाड, अशोक पवार खंडाळकर, बाबासाहेब गायकवाड, शंकर खैरनार, श्री विश्वासू, धोंडीराम राजपूत यांच्या उपस्थितीत व हस्ते या साडी चोळीचे वाटप करण्यात आले.
0 Comments