vaijapur news, पतसंस्थेला कर्जापोटी दिलेला धनादेश बाऊन्स

चेक बाऊन्स प्रकरणी नुकसान भरपाईचे आद
वैजापूर, ता.30 / प्रतिनिधी -

वैजापूर नागरी सहकारी पतसंस्थेकडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्या प्रकरणी आरोपीस सत्तर हजार रुपये नुकसाभरपाई म्हणून  फिर्यादी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापुरला द्यावी व रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिने साध्या कारावासाची शिक्षा असे आदेश  मुख्य न्यायदंडाधिकारी तथा तिसरे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) डी. एस. पिसाळ यांनी दिले.

वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था यांचे कडून आरोपी लताबाई नंदू जेजुरकर (राहणार किनगाव तालुका फुलंब्री) यांनी कर्ज घेतले होते. कर्जाऊ घेतलेल्या रकमेची ठरल्याप्रमाणे परतफेड न केल्यामुळे फिर्यादीने आरोपीकडे रकमेची मागणी केली. तेंव्हा आरोपीने फिर्यादी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूरच्या नावाने दोन फेब्रुवारी २०२१ चा ७० हजार ३३५ रुपयांच भारतीय स्टेट बँक शाखा वैजापूरचा धनादेश दिला. हा धनादेश फिर्यादीने बंधन बँक लि., शाखा वैजापूर येथे वटविण्यासाठी टाकला. 

परंतु पुरेशा रकमेअभावी आरोपीने दिलेला धनादेश न वटता अनादरित होऊन परत आला. धनादेश न वटता अनादरित होऊन परत आल्यानंतर फिर्यादीने आरोपीस नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम जमा करण्यास सांगितले होते. परंतु नोटीस मिळूनही आरोपीने धनदेशाची रक्कम मुदतीत जमा केली नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध वैजापूर येथील न्यायालयात धाव घेऊन ॲड. मजहर करीम बेग यांचेमार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने प्रकरणातील परिपूर्ण फिर्याद, साक्षीपुरावा व फिर्यादी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्थेचे वकील मजहर करीम बेग केलेल्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारावर न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. मजहर करीम बेग यांनी काम पाहिले.



Post a Comment

0 Comments