वैजापूर ता.01/ प्रतिनिधी - लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्ताने येथील अण्णाभाऊ साठेनगर जयंती उत्सव समिती, एल.एस. प्रतिष्ठाण व लहुजी वारीअर्स जयंती उत्सव समिती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.01) शहरातील लाडगाव चौफुली परिसरात असलेल्या लोकशाहीर -साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ एकत्र येत सामुदायिकपणे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा केला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतांना मुख्याधिकारी भागवत बिघोत, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत आदी
या मंडळाच्या सदस्यांनी शहर व परिसरातील सर्वच क्षेत्रात कार्य करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना अभिवादन कार्यक्रमासाठीसाठी निमंत्रित केले होते.
सकाळी साडे दहा वाजता अभिवादन कार्यक्रम आरंभ झाला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, मा. नगराध्यक्ष साबेरखान, डॉ, राजीव डोंगरे, शिवसेना (उबाठा) चे शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष अकील सेठ, शैलेश चव्हाण, दिनेश राजपूत, गणेश खैरे, सागर अस्वले, सचिन म्हस्के, बबन त्रिभुवन, मधुकर त्रिभुवन, वसंत त्रिभुवन, अल्ताफ बाबा, सोनू राजपूत, विनोद राजपूत, पारस घाटे, हाजी इम्रान कुरेशी, श्रीकांत साळुंके, दिलीप अनर्थे, आबा जेजुरकर, अण्णा ठेंगडे, सय्यद हिकमतउल्ला, चांगदेव उघडे, सामाजिक कार्यकर्ते ठाकुर धोंडीरामसिंग राजपूत, ज्ञानेश्वर टेके, तसेच शहरातील सर्वच थरातील मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आ .रमेश पाटील बोरणारे यांनीही भेट देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. अण्णाभाऊसाठे नगर, एल.एस. प्रतिष्ठाण व लहुजी वारिअर्स यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments