news today, वैजापूर येथे महसूल सप्ताहानिमित्त उत्कृष्ट अधिकारी - कर्मचाऱ्यांचा आ.बोरणारे यांच्याहस्ते गौरव

वैजापूर उपविभागात महसूल सप्ताहास आजपासून सुरुवात  ; विविध उपक्रम राबविणार 


वैजापूर, ता .02 / प्रतिनिधी - महसूल विभागाच्यावतीने राज्यात 1ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने वैजापूर उपविभागात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार असून योजनांचा प्रत्यक्ष लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या महसूल सप्ताहमध्ये नागरिकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी केले आहे.


महसूल दिनाचे औचित्य साधून 01 ऑगस्ट ते 07 ऑगस्ट 2025 या सात दिवसाच्या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येणार असल्याने वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात  शुक्रवारी (ता.01) आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहास सुरुवात करण्यात आली. यावेळी आ.बोरणारे यांच्याहस्ते महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आ. बोरणारे यांनी उपस्थित सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला व महसूल दिनाच्या सर्वांना शुभेछा दिल्या.


कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी देसाई, नायब तहसीलदार रामेश्वर महाजन, सूरज कुमावत,श्रीमती पुरी, गजानन जाधव,योगेश पुंडे, दिपक त्रिभुवन, जितेंद्र चापानेरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments