news today, तलवाडा गावाची पाण्याची तहान भागवणारा उंबरदरा साठवण तलाव अखेर पूर्णत्वाकडे

आ. बोरणारे यांच्याहस्ते जलपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न 

वैजापूर, ता.29/ प्रतिनिधी - तालुक्यातील मौजे तलवाडा येथील  (उंबरदरा) साठवण तलावाची दुरुस्ती व बांधकाम पूर्ण झाले असून या तलावातील पाण्याचे पूजन व लोकार्पण सोहळा  आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते गुरुवारी (ता.28) संपन्न झाला.


तलवाडा गावाची पाण्याची तहान भागवणारा आणि शेतकऱ्यांच्या अनेक वर्षाच्या मागणीला न्याय देणाऱ्या उंबरदरा तलावाची दुरुस्ती व बांधकामा करण्यात यावे अशी मागणी या भागातील शेतकरी व ग्रामस्थांची होती. आ.बोरणारे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून  तलावाच्या दुरुस्ती व बांधकामासाठी 1 कोटी 70 लाख रुपये निधी मंजूर करून आणला. साठवण तलावाचे काम पूर्ण होऊन त्यात पाणी साठले आहे. या कामांचे जलपूजन व लोकार्पण सोहळा आ.बोरणारे यांच्याहस्ते आज पार पडला.


माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, पी.आर.जाधव, गोरख पाटील आहेर, भागिनाथ मगर, विशाल शेळके, एल.एम.पवार, संदीप बोर्डे, प्रशांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांची यावेळी भाषणे झाली. तलवाडा हे माझ्या मतदारसंघातील शेवटचे गाव आहे. उंबरदरा साठवण तलाव व्हावा ही मागणी अनेक वर्षांपासून या गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची होती. त्यांच्या या मागणीला आज प्रत्यक्षात यश आले आहे.असे आ.बोरणारे यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. 


या साठवण तलावामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसाठी, जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल त्यामुळे परिसरातील शेतजमिनींची उत्पादकता वाढेल.या जलपूजनावेळी परिसरातील शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद पाहायला मिळाला. 
यावेळी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी मोठयासंख्येने उपस्थित होते.




.




Post a Comment

0 Comments