मुंबई, ता.11 - महायुती सरकारमधल्या भ्रष्ट कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करुन महाराष्ट्राची होत असलेली बदनामी थांबवावी या मागणीसाठी आज सोमवारी (ता.11) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
महायुती सरकारमधल्या कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करुन महाराष्ट्राची होत असलेली बदनामी थांबवावी, ह्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे घेण्यात आलेल्या राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी भ्रष्ट महायुती सरकारला धारेवर धरले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू तसेच शिवसेना उपनेते, सचिव, आमदार, विभागप्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये झालेल्या राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनी भ्रष्ट महायुती सरकारला धारेवर धरले. यावेळी युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, विनायक राऊत, ॲड.अनिल परब, शिवसेना आमदार भास्कर जाधव, आमदार सुनिल प्रभू तसेच शिवसेना उपनेते, सचिव, आमदार, विभागप्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर
छञपती संभाजीनगरातही विरोधी पक्षनेते अंबादास व, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दोषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.सरकारमधील कलंकित मंत्र्यांची आम्हाला लाज वाटते अशी घोषणाबाजी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज 11 ऑगस्ट रोजी क्रांती चौकात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आपल्या कलंकित कारनाम्यामुळे आणि वाचाळ वक्तव्यामुळे महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या या भ्रष्ट व कलंकीत मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत पत्ते दाखवताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगरात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ...
माझ्या राज्याचा मंत्री नोटाच्या बँग घेऊन बसतो, मला लाज वाटते. माझ्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतो, मला लाज वाटते. माझ्या राज्याचा मंत्री डांस बार चालवतो, मला लाज वाटते. माझ्या राज्याचा मंत्री विधीमंडळात रम्मी खेळतो मला लाज वाटते.माझ्या राज्याचा मंत्री अघोरी जादू टोना करतो, मला लाज वाटते, अशाप्रकारे जोरदार घोषणाबाजी करून आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.
0 Comments