वैजापूर, ता.11/ प्रतिनिधी - भरधाव टेम्पो ने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला तर त्यांची आई गंभीर जखमी झाली. वैजापूर - गंगापूर रस्त्यावर घायगांवजवळ
सोमवारी (ता.11) दुपारी ही घटना घडली.
सचिन सुखदेव वाहुळ (वय 40 वर्ष) रा. धामणगांव ता.येवला असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांची आई शेषबाई सुखदेव वाहुळ (वय 55 वर्ष) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सचिन वाहूळ व त्याची आई शेषबाई वाहुळ हे दोघे वडाळा बहिरोबा ता.गंगापूर येथून काकांचा अंत्यविधी आटोपून मोटरसायकलवर (एम.एच.15, डी आर.9143) घरी परत जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यात घायगावजवळ समोरून येणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.या घटनेत सचिन वाहूळ हे जागीच ठार झाले तर त्यांच्या आई शेषबाई यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या असून उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments