वैजापूर, ता. 11 / प्रतिनिधी - ऑपेरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवारी (ता.11) वैजापूर शहरात 'भारत शौर्य" तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी या पदयात्रेत सहभाग नोंदविला.
येथील जुने बस स्थानक परिसरातील ठक्कर बाजार येथून ही तिरंगा काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश पाटील गलांडे, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरु पाटील डिके, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विशाल संचेती,पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी आदींनी पुष्पहार अर्पणकेला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शिवराई रोड मार्गे ही पदयात्रा हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारक पोहचल्यानंतर तेथे सामूहिक राष्ट्रगीताने या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. या "तिरंगा पदयात्रेत माजी सैनिक, एन.सी. सी.छात्र, शहर व तालुक्यातील युवक, महिला, गणेश मंडळ, व्यायाम शाळा यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. "भारत माता की जय" "वंदे मातरम" भारतीय सैनिकांचा विजय असो" ऑपेरेशन सिंदूर झिंदाबाद," भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो "अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या तिरंगा पदयात्रेत बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप, साहेबराव पाटील औताडे, माजी नगरसेवक बिलाल सौदागर, प्रमोद कंगले, जयमाला वाघ,अनिता तांबे, शैलेश चव्हाण, गौरव दौडे, राजेश गायकवाड, प्रकाश माळी, चांगदेव उघडे, पदयात्रा नियोजक संदीप ठोंबरे, शैलेश पोंदे, प्रवीण तांबे, विनोद राजपूत, गोकुळ भुजबळ, गणेश खैरे, प्रा जवाहर कोठारी, ज्ञानेश्वर अंदमाने, गिरीश चापानेरकर, जितेंद्र पवार, प्रेम राजपूत, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, किरण व्यवहारे, गोरख मापारी, महेश भालेराव, पालिकेचे कर अधीक्षक ए बी. मेरगू स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, सेंट मोनिका शाळेचे प्राचार्य किशोर साळुंके यांच्यासह शहरातील नागरीक व विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
कु.अक्षदा, प्रा,कोठारी, ॲड. धरमसिंह राजपूत, मेजर सातुरे, शालिनीताई बुंधे यांनी मनोगत व्यक्त केले.राष्ट्र गीताने या"तिरंगा पदयात्रेचा"समारोप झाला.
0 Comments