crime news, वैजापूर येथील कुख्यात गुन्हेगार राहुल शिंदे एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एमपीडीए अंतर्गत कारवाई 

आवेज खान
------------------ 
वैजापूर, ता.10  - जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांना लक्ष करत पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एमपीडीए कायद्याअंतर्गत गुन्हेगारांवर सक्त कारवाई करून त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध केले व त्यांच्या गुन्हेगारीला लगाम लावला आहे. याच कायद्यान्वये वैजापूर येथील कुख्यात गुन्हेगार राहुल गणेश शिंदे (वय 27 वर्ष) रा. वडारवाडा, वैजापूर याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गणेश शिंदे याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये प्रतिबंधक कारवाई व एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती परंतु याबाबीचा त्याच्यावर काही एक परिणाम न होता त्याने त्याच्या धोकादायक व गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्या होत्या. त्यामुळे एमपीडीए कायद्यानुसार ( महाराष्ट्र प्रोव्हीबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे वैजापूर पोलिसांनी राहुल शिंदे याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. 
यावरून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 15 नोव्हेंबर 2024 रोजी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा आदेश पारित केला होता. त्यानुसार 9 ऑगस्ट रोजी राहुल शिंदे यास मध्यवृती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तत्कालीन पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस निरीक्षक एकनाथ नागरगोजे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक सुरासे, पोलीस अंमलदार प्रशांत गिते, अरबाज चौधरी, राजाराम कुके, भिवाजी कुऱ्हाडे व हवालदार गणेश काळे यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments