news today, पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी धरणात 100 क्युसेकने पाण्याची आवक ; 5.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध



वैजापूर, ता.10 / प्रतिनिधी - जुलै महिन्यात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने नाशिक जिल्हयातील विविध धरणांमध्ये 89.60 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालखेड धरणात 69.53 टक्के पाणीसाठा असून या धरणातून 5 ऑगस्टला डाव्या कालव्याव्दारे नारंगी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. 100 क्युसेकने हे पाणी वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणात येत असून आज या धरणात 5.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी धरणात पाण्याची आवक सुरू असून अत्यंत कमी प्रमाणात पाणी येत आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी धरणात पाण्याची आवक सुरू आहे

वैजापूर तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प व बोर दहेगाव मध्यम प्रकल्प या तीन धरणात आज ता.10 ऑगस्ट 2025 रोजी उपलब्ध असलेला पाणीसाठा असा -

1) नारंगी - ( मध्यम प्रकल्प ) 
  पाणीपातळी - 529.50  
  एकूण  क्षमता - 2.465 Mm3
  उपयुक्त क्षमता - 0.670 Mm3
   टक्केवारी- 5.83 %
2) कोल्ही -  (मध्यम प्रकल्प ) 
एकूण पाणीपातळी - 558.914M 
एकूण क्षमता - 2.383  Mm3
उपयुक्त क्षमता - 1.985 Mm3
टक्केवारी - 61.24 %
3) बोरदहेगाव  - (मध्यम प्रकल्प ) पाणीपातळी - dry 
एकूण क्षमता - dry 
उपयुक्त पाणीपातळी - dry 
टक्केवारी  - Nil

वैजापूर - गंगापूर तालुक्यासाठी नामका जलद कालव्याला आवर्तन 

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत पाणी विसर्ग बंद मात्र, जलद कालवा सुरू आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीचे दोन्ही कालवे तसेच वैजापूर - गंगापूर भागात जाणारा जलद कालवा सुरू आहे. पाण्याची आवक वाढली तर गोदावरीत पुन्हा विसर्ग होऊ शकतो.अशी माहिती सूत्रांनी दिली.




  

Post a Comment

0 Comments