वैजापूर, ता 10/ प्रतिनिधी - रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाणाऱ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री गंगापूर रस्त्यावर बाजठाण फाट्याजवळ घडली.किरण सुदाम पेटारे ( वय 25 रा. खंडाळा) असे मृताचे नाव आहे
पेटारे हा जेसीबी चालक होता. तो अहिल्यानगर येथे स्टोन क्रेशर वर जेसीबी चालक म्हणून काम करत होता. रक्षाबंधन सणाला तो दुचाकीवरून (एम.एच. 20, एच.ए.8834) गावाकडे जात होता. त्यावेळी बाजाठाण फाट्यावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने (एम.एच.20, ई.एल.1346) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात पेटारे यांचा जागेवर मृत्यू झाला. या अपघाताची विरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार विजय बाम्हदे हे करीत आहेत.
0 Comments