कृषी विभागाने केलेल्या कारवाईत वैजापूर तालुक्यातील संतोष कृषी सेवा केंद्र, धोंदलगाव, नाथ कृषी उद्योग, गारज व ओम साई ट्रेडर्स, खंडाळा या तीन कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे. केंद्र शासनामार्फत करण्यात येणारा खत पुरवठा ई - पॉस प्रणालीवर उपलब्ध असलेल्या खत साठ्याच्या अनुषंगाने करण्यात येतो. ई - पॉस प्रणालीवरून विक्री न केल्याने कृषी सेवा केंद्राच्या ई - पॉस प्रणालीवर जास्त खत साठा तसेच प्रत्यक्ष कृषी सेवा केंद्रावर कमी खत साठा अशी परिस्थिती निर्माण होते.त्याचा परिणाम जिल्ह्याच्या खत पुरवठा मागणीवर होतो. शेतकऱ्यांनी देखील अनुदानित खते खरेदी करताना ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी पाटील व कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी केले आहे.
0 Comments