वैजापूर, ता.09/ प्रतिनिधी - राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी शनिवारी (ता.08) वैजापूरला भेट दिली. माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी व भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर डॉ. दिनेश परदेशी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत वैजापूर शहर व तालुक्यातील विविध विकास प्रश्नांवर चर्चा झाली.
वैजापूर शहरात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना नसल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज असल्याचे डॉ. दिनेश परदेशी यांनी यावेळी सांगितले. त्यावर खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांतून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य कमान व म्युझियम उभारण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. डॉ. गोपछडे यांनी प्रस्तावित जागेची पाहणी करून नियोजनाची माहिती घेतली.
0 Comments