news today, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दामिनी पथकातील महिला व अधिकारी समवेत साजरा केला राखी पौर्णिमेचा सण



छत्रपती संभाजीनगर, ता.09 / प्रतिनिधी -  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर दामिनी पथकातील महिला कर्मचारी व अधिकारी यांच्यासमवेत आज राखी पौर्णिमाचा सण साजरा केला. महिला अधिकारी आणि कर्मचारी भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या. 

महिला अधिकारी व कर्मचारी भगिनींनी या पवित्र सणाच्या शुभमुहूर्तावर राखी बांधली. राखी पौर्णिमा सणाला बहिणीने औक्षण केल्यानंतर सणाच्या परंपरेनुसार भाऊ बहिणीला भेट वस्तू देतो. त्याचप्रमाणे आज औक्षण केल्यानंतर महिला कर्मचारी व अधिकारी यांना भेट वस्तू दिल्या.आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हा सण साजरा झाला. याप्रसंगी पोलिस आयुक्त  प्रविण पवार व उपायुक्त श्री. नवले उपस्थित होते.

भगवान बाबा आश्रमातही चिमुकल्यांसोबत राखी पौर्णिमेचा सण साजरा करतांना विरोधी पक्षनेते ना. दानवे

विरोधी पक्षनेते दानवे यांनी संभाजीनगर येथील भगवान बाबा बालिका आश्रमातील चिमुकल्यांसोबतही आज राखी पौर्णिमाचा सण साजरा केला. रक्ताच्या नात्यांची जीवनात साथ न लाभलेल्या या चिमुकलींसोबत भाऊ बहिणीच्या अतुट नात्याचा व स्नेहभावाचा हा सण साजरा करणे म्हणजे सणाचा खरा आनंद लाभणे. आज रक्षाबंधनाचा पवित्र सण मनःपूर्वक या बालिकाश्रमात आनंद पूर्वक साजरा केला. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे व संचालक कविता वाघ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments