news today, जरांगे पाटील यांच्या 'चलो मुंबई' आंदोलनात मोठ्यासंख्येने सहभागी व्हा - प्रशांत पाटील सदाफळ


वैजापूर, 09 / प्रतिनिधी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा लढा उभारला असून मराठा समाजाच्या माध्यमातून 29 ऑगस्टला 'मुंबई चलो' चा नारा देण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संपूर्ण तालुक्यात मराठा समाजातील बांधवांसोबत बैठका घेऊन जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात मोठ्यासंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे 29 आँगष्ट 2025 रोजी होणाऱ्या आंदोलनात समाज बांधवांचा मोठा सहभाग असावा यासाठी वैजापूर तालुक्यातील अनेक गावात प्रशांत पाटील सदाफळ हे मराठा समाज बांधवांच्या बैठका घेत असून या बैठकांना प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाला सगेसोयरे आरक्षण व हैदराबाद गँजेट लागू करावे यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 आँगष्ट मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला येण्याचे आवाहन या बैठकांतून केले जात आहे. तसेच गावातील कुणबी नोंदी वंशावळी नुसार सापडलेल्या आहेत अशा लोकांनी कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे, त्याचे फायदे काय आहे याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. प्रशांत पाटील यांच्यासोबत मराठा सेवक तालुक्यातील गावागावांत दौरे करून मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.




Post a Comment

0 Comments