news today, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन

पुणे येथे आयोजित शेतकरी हक्क परिषदेतील निर्णय 

पुणे, ता 09 - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन उभारले जाणार आहे. या आंदोलनाची दिशा आणि कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी 15 ऑगस्टनंतर राज्यातील सर्व शेतकरी संघटना आणि समविचारी पक्षांचे अधिवेशन भरविण्यात येणार आहे.

पुणे येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात शेतकरी संघटनांच्यावतीने शुक्रवारी (ता.08) शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत हा निर्धार करण्यात आला.परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी,प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू, अखिल भारतीय किसान संघटनेचे सहसचिव डॉ.अजित नवले, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.
येत्या 16 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी संघटनांची बैठक घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments