वैजापूर, ता.09 / प्रतिनिधी - येथील तहसीलदार सुनिल सावंत यांना 2024-2025 या वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याहस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणून प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (08) हा कार्यक्रम झाला. महसुल व इतर जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या तसेच महसुल वसुली त्यांनी उद्दीष्टापेक्षा जास्त म्हणजे 108 टक्के इतकी केली. ॲग्रीस्टीक नोंदणी, पिक पाहणी, लाडकी बहिण योजना, गौण खनिज कारवाया या मध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले.तसेच विवीध गावात शिबीरे आयोजित करुन आदिवासींना विविध प्रकारचे प्रमाणपत्र व शिधापत्रिका वाटप केले..
मयत शेतकऱ्यांचे सातबारा (जिवंत सातबारा) वारसांच्या नावे करण्याची अनेक प्रकरणे मार्गी लावली. त्यामुळे तहसीलदार सुनील सावंत यांना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड आदींची उपस्थिती होती.
उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल तहसीलदार सुनिल सावंत यांचे आ.रमेश पाटील बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments