शिधापत्रिका संदर्भातील कामे न झाल्यास खुर्चीला हार घालून निषेध करणार - ज्ञानेश्वर घोडके
वैजापूर, ता.29 - वैजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सुरू असलेल्या अनागोदी कारभाराला तालुक्यातील नागरीक कंटाळले असून अनेकवेळा चकरा.मारूनही शिधापत्रिका संदर्भात असलेली कामे होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.29) पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पुरावठा विभागातील नायब तहसीलदार यांच्या खुर्चीला चपलाचा हार घालणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धोडके यांनी यावेळी दिला.
वैजापूर पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधरकाना धान्य वेळेवर मिळत नाही तसेच शिधापत्रिकामध्ये नविन नाव समाविष्ट करणे व नाव कमी करण्यासाठी लोकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. आधारकार्ड किंवा शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी शासनाकडून ऑपरेटर म्हणून नेमणूक करण्यात आलेली असताना नायब तहसीलदार काकडे हे सेतुसुविधा केंद्राकडे प्रस्ताव देण्यासाठी सांगतात. मग तहसील कार्यालय कशासाठी हा प्रश्न नागरिकांना पडतो आहे असा प्रश्न घोडके यांनी उपस्थित केला वेबसाईट बंद असल्याचे कारण सांगत वेळ मारुन नेली जाते. सहा महिने - वर्षांपासून लोकांची कामे प्रलंबित आहेत मग प्रशासन करतं काय ? .सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असलेले अधिकारी मात्र, काम न करता शिधापत्रिकाधारकांना नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देतात. असा आरोपही घोडके यांनी केला.
तहसील कार्यालयात जमलेल्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष जावेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष अशोक देवकर, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष दिनेश त्रिभुवन यांच्यासह कार्यकर्ते आज तहसील कार्यालयात गेले असता अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. घोडके यांनी नायब तहसीलदार काकडे यांना फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर घोडके यांनी तुमच्या खुर्चीला फुलाचा हार घालून निषेध व्यक्त करणार असल्याचे त्यांना सांगताच नायब तहसीलदार काकडे यांनी धाव घेत कार्यालय गाठले. यावेळी घोडके यांनी नायब तहसीलदार काकडे यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही जनतेचे सेवक आहात,
तहसील कार्यालयात ऑपरेटर असताना लोकांना सेतुसुविधा केंद्रात पाठवायचे कारण काय असा प्रश्न विचारून
शिधापत्रिका संदर्भात प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढा अशी मागणी केली. अन्यथा तुमच्या खुर्चीला चपलाचा हार घालून निषेध केला जाईल असा इशारा ज्ञानेश्वर घोडके यांनी यावेळी दिला.
0 Comments