पुराच्या पाण्यातून काढली रुग्णवाहिका ; चालक बाबासाहेब थोरात यांचे धाडस ...
वैजापूर, ता. 29 - वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथील सगुणा रामा नन्नवरे या महिलेला प्रसूतीसाठी लाडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात येण्यासाठी पुरपरिस्थितीमुळे सर्वच रस्ते बंद होते.. परंतु लाडगाव येथील रुग्णवाहिका वाहन चालक बाबासाहेब थोरात यांनी धाडसी निर्णय घेऊन आपल्या जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यातून रुग्णवाहिका काढली व सदर महिलेस प्रसूतीसाठी वेळेत लाडगाव प्राथमिक रुग्णालयात सुखरूप पोहचवले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वृषाली हजारे, आरोग्य सेवक मनोज गायकवाड, विद्या गायकवाड,चेतली चव्हाण, कापूसवाडगाव येथील ज्ञानेश्वर निगळ, रोजगार सेवक रेवन कदम, भालगाव येथील सुरज शिंदे यांची मोलाची साथ लाभली. रुग्णवाहिका चालक बाबासाहेब थोरात यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments