लोणी खुर्द, ता.29 - वैजापूर तालुक्यातील डोंगर थडी भागात लोणी खुर्द सह परिसरात अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेल्या लोणी खुर्द येथील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या 50 ते 60 कुटुंबांना आमदार रमेश बोरणारे यांच्याकडून सोमवारी (ता.29) तातडीने किराणा किटसचे वाटप करण्यात आले. आमदार बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांनी लोणी खुर्द येथे प्रत्यक्ष बाधित कुटुंबाची भेट घेऊन किराणा किटचे वाटप केले.
यावेळी संजय बोरनारे, बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथराव मगर, रंजीत चव्हाण, अंबादास खोसे, अतुल कुंदे, बाळासाहेब जाधव, आनंद निकम, विजय दत्तात्रय जाधव, रिखबशेठ पाटणी, उत्तमराव निकम, गोरख आहेर, गजानन निकम, राजेंद्र जगदाळे, भाऊसाहेब जाधव, राधाकृष्ण सोनवणे, भिमराज जाधव, आर.के.निकम, दादाभाऊ जाधव, गणेश सोमासे, सचिन तांबे, जगदीश निकम, योगेश जाधव,यांच्यासह पदाधिकारी वग्रमस्थ उपस्थित होते.
0 Comments