वैजापूर, ता.29 - तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे हडसपिंपळगांव शिवारातील ढेकू नदीला पूर येऊन वाड्या वस्त्यांवरील अनेक जण पुरामुळे अडकली होती. 80 वर्षीय गणपत त्र्यंबक निघोटे पुराच्या पाण्यामुळे शेतमळ्यात अडकले होते. यावेळी या भागात पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांना ही माहिती मिळताच त्यांनी रेसक्यू टीम मधील जवानांसोबत घटनास्थळी जाऊन निघोटे यांना सुरक्षित बाहेर काढले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ व काही तरुण दानवे यांच्यासोबत होते.
हडस पिंपळगाव येथे ढेकू नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या 80 वर्षीय वृध्द व्यक्तीला दानवे यांनी रेस्क्यूटीमच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले...
0 Comments