महाविकास आघाडीकडून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी
मुंबई, ता.31 - आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) अकरा जागांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे.
छत्रपती संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुहास शिरसाट (फुलंब्री) यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. शिरसाट हे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. या यादीत जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. हे सर्व उमेदवार उद्या सोमवारी (ता 01) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक - 2026 साठी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपने मतदारसंघनिहाय जाहीर केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे...
धाराशिव-लातूर - बीड: बसवराज पाटील, अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे, भंडारा-गोंदिया. -अविनाश ब्राह्मणकर, अमरावती - प्रविण पोटे पाटील, जळगाव - नंदकिशोर महाजन, नागपूर - डॉ. राजीव पोतदार, वर्धा-चंद्रपूर - गडचिरोली - अरुण लखानी, सांगली - सातारा - धैर्यशील कदम, सोलापूर - राजेंद्र राऊत, छत्रपती संभाजीनगर - जालना - सुहास शिरसाट, नांदेड - अमर राजूरकर
उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाने विश्वास दाखवलेले हे सर्व अकरा उमेदवार उद्या आपापल्या मतदारसंघासाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ही यादी जाहीर केल्यामुळे आता विरोधक यावर काय रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments