छत्रपती संभाजीनगर, ता.30 - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.30) उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. या पहिल्याच बैठकीत प्रशासक काळातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध प्रमुख विभागांचा विभागनिहाय आढावा घेऊन पुढील नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मतदार संघातील विकास प्रश्न मांडताना जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे
पहिल्याच सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी वांजरगाव जिल्हा परिषद गटातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. बैठकीत प्रामुख्याने अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य, सिंचन व पाणीपुरवठा, पशुवैद्यकीय, महिला - बालकल्याण व समाज कल्याण विभाग या विभागांचा आढावा घेण्यात आला.
सर्वसाधारण सभेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळके, उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड, शिक्षण व आरोग्य सभापती अनिताताई मोटे, समाज कल्याण सभापती. बालाजी सोनटक्के
यांच्यासह जिल्हा परीषदेचे सर्व सदस्य, विभाग प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0 Comments