वैजापूर, ता.30 - जिल्हा न्यायालय व नगर परिषद वैजापूर यांच्या संयुक्तविद्यमाने सोमवारी (ता.29) वैजापूर नगरपालिकेत महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती आणि जिल्हा वकील संघ वैजापूर यांच्या माध्यमातून दिवाणी न्यायाधीश क.स्तर श्री एन.काळे व पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या उपस्थितीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात महिलांसाठी निर्माण केलेले कायदे, त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक अडडचणीतून मार्ग कशा पद्धतीने काढावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास ॲड.मजहर बेग (अध्यक्ष वकील संघ वैजापूर ) ॲड. सोपान पवार, ॲड.ज्योती शिंदे (कापसे), ॲड.ज्ञानेश्वर वरपे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी सुनिल भाग्यवंत यांनी केले. या शिबीरास शहरातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शिबीर यशस्वी करण्यासाठी समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन, सोनचीरेया च्या अध्यक्षा चित्रा थोरात, ललिता देशमुख, सूर्यकांता काकडे, जगदीश पहाडी यांनी प्रयत्न केले.
0 Comments