भाजप -12 जागा, शिवसेना - 2 जागा , राष्ट्रवादी - 2 जागा
मुंबई, ता.23 - महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचे प्राथमिक सूत्र ठरल्याचे समोर आले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकूण 17 जागांचे वाटप निश्चित झाले असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यानुसार भाजपला 12, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
जागा वाटपात छञपती संभाजीनगरची जागा भाजपला सुटली आहे .अहिल्यानगरची जागा राष्ट्रवादीकडून भाजपकडे जाण्याची शक्यता असून तेथे भाजपचे नगरसेवक अधिक असल्याने दावा मजबूत आहे. पूर्वी ही जागा राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप यांच्याकडे होती, त्यांची मुदत संपून निधनानंतर रिक्तता निर्माण झाली. आगामी निवडणुकीत या जागेवर कोणत्या पक्षाचा अधिकार राहील यावर राजकीय चर्चा सुरू आहे. मतदारसंख्येचे प्रमाण आणि स्थानिक प्रतिनिधित्वाच्या आधारे अदलाबदल करण्याचा विचार महायुतीत केला जात आहे. यामुळे जागावाटप अंतिम होण्यापूर्वीच राजकीय तणाव वाढला आहे या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ अपेक्षित आहे असे राजकीय वर्तुळात मानले
कोणाला कोणत्या जागा ?
भाजप (12 जागा) : नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर.
शिवसेना (2 जागा) : ठाणे, नाशिक आणि यवतमाळ.
राष्ट्रवादी काँग्रेस (2 जागा) : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी.
0 Comments