मुंबई, ता.22 - काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियानाअंतर्गत 69 नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.या निवडीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीसाठी प्रत्येक जिल्ह्यांमधून सहा नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यातून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. नियुक्त्यांमध्ये सर्व समाजघटकांना सामावून घेतल्याचा चदावा काँग्रेसने केला .यामध्ये खुल्या प्रवर्गातून 24, इतर मागासवर्ग 22, अल्पसंख्यांक 7, अनुसूचित जाती 7, अनुसूचित जमाती 3, भटक्या विमुक्त जमाती 2 तर 3 महिला जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
काँग्रेसच्या छञपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगांवकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली असून शहराध्यक्षपदी ॲड. सय्यद अक्रम यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षाने बुधवारी या नियुक्त्या घोषित केल्या. सध्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेल्या किरण पाटील डोणगांवकर यांना या पदावर कायम ठेवले आहे.
0 Comments