हसन सय्यद
-------------------------
लोणी खुर्द, ता.22 - वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील भादली गावात शेत शिवारात काल चार वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रभाकर धोंडीबा सोनवणे यांचे घराचे पत्रे उडून गेले तर अनेक शेतकऱ्यांचे सोलर पॅनल उडाले असून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. अचानक वादळी वाऱ्याच्या तडाख्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली असून पिकांची झकपाक करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची धांदल उडाली यामध्ये संतोष रामभाऊ बागुल, निर्मला विश्वनाथ चव्हाण, अनिता भावलाल जाधव , रमनबाई जयराम जाधव,साईनाथ गोपीनाथ सोनवणे, मीना संजय चव्हाण, पंडित भिका पवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करून वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. आ.बोरणारे यांच्या निर्देशानुसार ग्राम महसूल अधिकारी यांनी तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून घेतले.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथ मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव , गोरख आहेर ,योगेश लांडगे, सागर बागुल, वाल्मीक भुरे, विजय सोनवणे ,जनार्दन जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
0 Comments