शहर व परिसरात वीज पुरवठा खंडित ...
वैजापूर, ता.22 - सलग दोन दिवस वैजापूर तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांची पडझड होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. (शुक्रवारी ता.22) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वैजापूर शहरासह लगतच्या काही भागात सोसाटयाच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शहराच्या काही भागात झाडे कोसळली, व विजेचे खांब पडल्याच्या घटनाही घडल्या. सायंकाळी काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. गेल्या चार-पाच दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्याच्या उष्णतेपासून नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी वादळ वाऱ्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील भादली येथे गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रभाकर सोनवणे यांच्या घराचे पत्रे उडून गेले. अनेक शेतकऱ्यांचे सोलार पॅनल उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला तेच संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.
वैजापूर शहरात आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे शहरालगत असलेल्या नाईकवाडी वस्ती येथील रहिवासी देवीदास आसाराम नाईकवाडी यांच्या घरावरील पत्र्यांचे छत उडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घटनेत संसारपयोगी साहित्याचे देखील मोठे नुकसान झाले.तर तालुक्यातील नांदगाव,भगाव व परिसरतील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे या भागात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली व शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात कैलास कोल्हे यांचे शेड नेट पूर्ण फाटले. तर पंचफुला योगेश गाढे यांचा घर कोसळले. भाऊसाहेब रहाणे यांच्या घराचे नुकसान झाल्याचे समोर आले असून नवनाथ रहाणे यांच्या कांदा चाळीचे नुकसान झाले आहे. तसेच नारायण थोट,, राजू थोट, संतोष परनामे, यांच्या घराचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
0 Comments