बँकेची मतदार यादी अंतिम करताना शेती कर्ज पुरवठा करणाऱ्या व विविध कार्यकारी सोसायट्यांचा मतदार संघ -1 मधून जिल्हयातील 8 जणांची नावे वगळण्यात आली आहेत. बिगर शेती कर्ज पुरवठा करणाऱ्या व विणकर सोसायट्यांचा मतदार संघ -2 मधून 35 जणांची, मार्केटिंग व प्रोसेसिंग सोसायट्यांचा मतदार संघ -3 मधून 48 मतदारांची नावे वगळली आहे व्यक्तिगत भाग धारण करणाऱ्या सभासदांच्या मतदार संघातून 22 जणांची नावे वगळण्यात आली आहेत.
सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह त्यांचे पुत्र समीर व आमेर यांची नावे व्यातिगत भाग धारण करणाऱ्या सभासदांच्या मतदार संघातूनही ठराव करून पाठवल्याने ती वगळण्यात आली आहे. मात्र, या तिघांची नांवे मार्केटिंग व प्रोससिंग सोसायट्यांच्या मतदार संघ -3 मध्ये यादीत समाविष्ट आहेत.
0 Comments