वैजापूर ता.31 - शहर व तालुक्यात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती रविवारी (ता.31) उत्साहात साजरा करण्यात आली. युवा प्रतिष्ठाणच्यावतीने विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित करून अहिल्यादेवी होळकर यांना शहरातील सर्व समुदायातील नागरिकांनी एकत्र येत अभिवादन केले.
सकाळी दहा वाजता शहरातील अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आमदार प्रा.रमेश पाटील बोरनारे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, पालिकेचे उपाध्यक्ष रियाज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे हाजी अकिल शेख यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रक्तदान शिबिराचे उदघाटनही यावेळी त्यांच्याहस्ते करण्यात आले..
या प्रसंग जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, श्रीराम गायकवाड, पंकज पाटील ठोंबरे, नगरसेवक राजेश गायकवाड, हमीद कुरेशी, लिमेश वाणी, देविदास वाणी, गोकुळ भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, प्रशांत त्रिभुवन, सचिन जोशी, शैलेश पोंदे, गिरीश चापानेरकर, अशोक पवार, सचिन राजपूत, दीपक साळुंके, मंजुषा ढाकरे,सुनीता साखरे, श्रीमती कदम, कल्याण काळे, प्रदीप साळुंके, ज्ञानेश्वर सिरसाट, सोपान पगार, चांगदेव उघडे यांची उपस्थिती होती.
सूत्र संचलन व आभार धोंडीरामसिंह ठाकूर यांनी मानले. लोकमाता युवा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकरांच्या 301 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा मिरवणूक, मर्दानी खेळ, पारंपरिक सांस्कृतिक वाद्य व रक्तदान शिबिर अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवीं होळकर याना अभिवादन करण्यात आले. सदरील कार्यक्रम लोकमाता अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
0 Comments