त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे
प्रा.भास्कर चंदनशिव यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. राज्य शासनाने उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठीच्या तीन पुरस्कारासह अत्रे,आदर्श शिक्षक, दलितमित्र आदी पुरस्कारानीही त्यांना गौरविण्यात आले होते.मराठी साहित्य अकादमीचे व महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. प्रा. चंदनशिव यांनी जांभूळढव्ह, मरणकळा, रानसय या सांरख्या कथासंग्रहासह संपादन, समीक्षा प्रांतातील साहित्य लेखन केले आहे.अंबाजोगाईत त्यांचे शिक्षण झाले. वैजापूर गंगापूर, बीड येथील महाविद्यालयात त्यांनी मराठी विषय अध्यापनाचे कार्य केले. त्यांचे साहित्य महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात अभ्यासक्रमात आहेत.
0 Comments