news today, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष

आता इच्छुकांच्या नजरा गट आणि गण आरक्षणाकडे...

वैजापूर, ता.13 - जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण शुक्रवारी (ता.12) राज्य पातळीवरून ग्राम विकास विभागाने जाहीर केले आहे. आता इच्छुकांच्या नजरा गट आणि गणांच्या आरक्षणाकडे लागल्या असून जिल्हा परिषद गटात मनाप्रमाणे आरक्षण न निघाल्यास पंचायत समितीच्या आरक्षणाकडे लक्ष राहणार आहे.
.    
      छञपती संभाजीनगर जिल्हा परिषद नवीन इमारत 

राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव व.मु.भरोसे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर केले आहे. यात छञपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले आहे. तर जिल्हयातील नऊ पंचायत समित्यांचे सभापती पदाच्या आरक्षणाची संख्या निश्चित करण्यात आली आहे. आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती सभापतीपद यांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

            
                   वैजापूर पंचायत समिती इमारत

छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पंचायत समितीच्या नऊ सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 1, ओबीसी महिला 1, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3 आणि महिलासाठी 3 याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद गटांचे आरक्षण निश्चित करताना त्या त्या तालुक्यात असणाऱ्या प्रवर्गाच्या लोकसंख्येनिहाय 63 गटांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. या आरक्षणावर अनेकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही राजकीयदृष्ट्या महत्वाची असल्याने तालुक्यातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांच्या नजरा आता या आरक्षणाकडे राहणार आहे.

अशी असू शकते आरक्षणाची टक्केवारी ...

जिल्हा परिषदेच्या एकूण 63 गट आणि 126 गणांपैकी अनुसूची जाती 13 टक्के, अनुसूचित जमाती 7 टक्के, ओबीसी 27 टक्के आणि उर्वरित प्रवर्गातून एकूण मिळून 51 टक्यांच्यापुढे राखीव आरक्षण न जाता आरक्षण काढण्यात येणार असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments