news today, श्री क्षेत्र घृष्णेश्वर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानअंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न

प्रशिक्षण वर्गाला वैजापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रतिसाद ...

जापूर, ता. 02 - श्रीक्षेत्र घृष्णेश्वर महादेवाच्या पवित्र नगरीत पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियानअंतर्गत आयोजित छत्रपती संभाजीनगर पश्चिम जिल्हा प्रशिक्षण वर्ग 29 व 30 मे 2026 रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गातून प्रत्येक कार्यकर्त्याला विचारांची समृद्ध शिदोरी, कार्याची स्पष्ट दिशा आणि राष्ट्रसेवेची नवचैतन्यपूर्ण प्रेरणा मिळाली. देशातील गरीब वंचित शोषित उपेक्षित समाजाचे सर्वांगीण उत्थान व्हावे, पक्षाचा इतिहास, विचारधारा, संघटनशक्ती, बूथ सक्षमीकरण, कार्यकर्ता विकास आणि राष्ट्रनिर्माणातील आपली भूमिका यांचा सखोल अभ्यास करताना प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पक्षनिष्ठा, कर्तव्यभावना आणि संघटनाप्रती समर्पण अधिक दृढ झाले.याप्रसंगी संजय खंबायते, डॉक्टर राजेंद्र फडके, श्रीमती वर्षा भोसले, नवनाथजी बन, संजयजी कुटे. प्रशांत बंब व छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी डॉ.प्रीतम मुंडे यांनी मार्गदर्शन केले  मनोज पांगारकर यांनी भारतीय जनता पक्षाचा इतिहास उलगडत पक्षाच्या वैचारिक अधिष्ठानापासून ते आजच्या यशस्वी प्रवासापर्यंतचा प्रेरणादायी आढावा मांडला. प्रवीण घुगे यांनी स्थायी कार्यक्रम, बूथ नियोजन आणि मन की बात या विषयांवर मार्गदर्शन करत संघटन बळकट करण्यासाठी तळागाळातील कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आ.संजय केणेकर यांनी कार्यकर्ता विकास आणि संगोपन या विषयावर बोलताना कार्यकर्ताच संघटनेचा आत्मा असून त्याचे सातत्याने प्रशिक्षण, जतन आणि प्रोत्साहन आवश्यक असल्याचे सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी देशासमोरील आव्हाने आणि त्यावरील निदानासाठी आमचे प्रयत्न या विषयावर मार्गदर्शन करत केंद्र सरकारच्या विविध जनहितकारी उपक्रमांची माहिती दिली तसेच विकसित भारताच्या संकल्पनेचा वेध घेतला.
 जिल्हा प्रभारी माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांची संपूर्ण वेळ उपस्थिती, कार्यकर्त्यांशी साधलेला आत्मीय संवाद आणि संघटन विषयक मार्गदर्शन हे विशेष प्रेरणादायी ठरले.मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, सचिन गरड व मीनाक्षी पवार यांनी लोकप्रतिनिधी किंवा नेते म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून सर्वांमध्ये मिसळून दिलेला सहभाग कार्यकर्त्यांच्या मनाला विशेष भावला.

प्रशिक्षणार्थींच्या आगमनापासून ते त्यांच्या सुरक्षित परतीपर्यंत प्रत्येक बाबीची कुटुंबवत्सल भावनेने काळजी घेणाऱ्या सर्व व्यवस्था प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा प्रशिक्षण वर्ग भव्य, दिव्य आणि संस्मरणीय ठरला.या प्रशिक्षण वर्गाच्या नियोजन समितीमध्ये डॉ.प्रीतमताई मुंडे, डॉ.दिनेश परदेशी, दशरथ बनकर, नारायण पाटील.कवडे, परसराम बारगळ,विनोद राजपूत, प्रेम राजपूत, शैलेश पोंदे, वैशालीताई पवार, सौरभ कुलकर्णी, प्रकाश वाकळे, दिनेश अंभोरे, प्रकाश चव्हाण,अविनाश गायकवाड, विकास कापसे,अमोल जाधव,सुभाष काळे,ज्योतीताई गायकवाड यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले 

Post a Comment

0 Comments