newe today, वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराला प्रतिसाद 42 जणांनी केले रक्तदान

वैजापूर, ता.02 - येथील वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराला मंगळवारी (ता.02) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात सामाजिक दायित्वाच्या नात्याने एकूण 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.

उपजिल्हा रुग्णालय व साई माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.अरविंद हरबडे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यापक दृष्टिकोनातून या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र काटकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य महेश बुनगे, मनोज गायकवाड, डाॅ.सचिन चव्हाण, मोतीराम बसवेकर, ज्ञानेश्वर आदमाने, ओबीसी जिल्हाध्यक्ष डाॅ.गिते, डाॅ.रेश्मा, डाॅ.कंठेवाड, मेट्रन श्रीमती रुख्मीनी गवई, ॲड. महेश कदम, तुषार थोट, संकेत वाणी, बंटी अनर्थे, डाॅ.राठी, डाॅ.अभंंग यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. धोंडिरामसिंग राजपुत यानी रक्तदानाचे महत्व विषद केले.सुत्रसंंचलन किशोर वाघुले यांनी केले.

या रक्तदान शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय रक्तपेढीतील रक्त संकलन डाॅ.अरुण मरमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
शिबिरात सामाजिक दायित्वाच्या नात्याने  एकूण 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. 

रुग्णालयातील श्याम उचित, राम उचित, नन्नावरे, लक्ष्मीकांत दुबे, रविकांत गडकरी, भरत जगताप, सुरेश शिंदे, कल्पना पगडे, निलेश चाफेकर, बापु वाळके, शशिकांत पाटील, विजय पाटील, अंजली गायकवाड, मनीषा गायकवाड, अर्चना वाघ, माया पाटील, जगदीश ब्रदर, हनीफ शेख, विनायक धामणे, क्षीरसागर, विजय साळवे, चेतन बागुल, शुभांगी पांडे, रामेश्वर सोनुने, हरिभाऊ बोराडे, संजय किर्तीकर, शुभम निखाडे, ज्ञानेश्वर भारुड, किसन चौधरी, नितीन मोरे, वाहेद पठाण आदींचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments