याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तालुक्यातील बेलगाव शिवारात जुन्या वैजापूर - बेलगाव रोडवर शेतकरी बैलगाडीने जात असताना त्याला मृतदेह दिसून आला. याबाबत शेतकऱ्याने गावातील पोलिस पाटील यांना माहिती दिली. पोलिस पाटील अनिल धीवर यांनी तातडीने पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना ही माहिती दिली.
माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले,यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता तेथे नग्न व अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह दिसून आला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मयताचे वय अंदाजे 25 ते 35 वर्षे असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनीही भेट दिली. दरम्यान मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
0 Comments