वैजापूर, ता.01 - पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यापर्यत योजनेचा अधिक व्यापक लाभ पोहचवण्यासाठी दि 01 जून 2026 ते दि 30 जून 2026 या कालावधीत वैजापूर नगरपालिकेच्यावतीने 'पीएम स्वनिधी महोत्सव' आयोजित करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी.उपनगराध्यक्ष शेख रियाज शेख अकिल व पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर शहरात स्वनिधी महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये स्वनिधी महोत्सव राबण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे .पीएम स्वनिधी योजनेतील यशोगाथाचा उत्सव साजरा करणे, पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे. योजनेबाबत जनजागृती वाढवून अधिकाधिक पात्र पथविक्रेत्याना लाभ मिळवून देणे. डिजिटल व्यवहार, आर्थिक साक्षरता व वित्तीय समावेशनाला चालना देण्यात येणार आहे .
1 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत पीएम स्वनिधी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या योजनेचा लाभ घेण्यात यावाअसे आवाहन वैजापूर नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments