कविटखेडा व अंचलगाव येथील घटना..
हसन सय्यद
--------------------------
लोणी खुर्द, ता.30 - वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी-ओढ्यांना पूर आले असून त्यामुळे दुर्घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नुकत्याच डोंगरथडी भागातील कविटखेडा व अंचलगाव शिवारात घडलेल्या दोन वेगळ्या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कविटखेडा (ता. वैजापूर) येथील गौरव कृष्णा शिंदे (वय 14 वर्ष) हा अल्पवयीन मुलगा लोणी–बोलठाण मार्गावरील नदीवरील पुलावरून वाहून गेला. ही घटना घडताच गावकऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र जोरदार प्रवाहामुळे मुलाचा शोध लागत नसल्याने प्रशासनाने शोधमोहीम हाती घेतली आहे. सदर मुलाचा मृतदेह अद्याप सायंकाळपर्यंत मिळून आलेला नव्हता. घटनास्थळी पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.
दरम्यान, दुसरी घटना अंचलगाव शिवारात घडली. मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील मुलगा राज गुलाब ब्राह्मणी (वय 10 वर्ष) लखनगाव सेंधवा (मध्य प्रदेश) येथील तरुण दि.29 रोजी दुपारी दोनच्या सुमारास ओढ्यातील पाण्यात वाहून गेला. शेतमजुरीसाठी आलेल्या इतर कामगारांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
राज ब्राह्मणी या मृत बालकाचा मृतदेह मिळून आला असून शवविच्छेदनासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.तर कविडखेडा येथील घटनेची शोधमोहीम सुरू असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, पोलीस कर्मचारी पवार, बोरकर, तांबे, जगताप तसेच नायब तहसिलदार राजपूत, मंडळ अधिकारी जाधव मॅडम, तलाठी , जालिंदर वाघ, रामेश्वर साळुंके आदी मान्यवर उपस्थित आहेत.
0 Comments