6 ऑक्टोबरपर्यंत काम करण्याचे प्रशासनाने पत्र ; उपोषण मागे
वैजापूर, ता.30 - शहरातील मुख्य चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकसमोरील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.29) उपोषण करण्यात आले. 6 ऑक्टोबरपर्यंत काम करण्याचे प्रशासनाच्यावतीने आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 या महामार्गावरील मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असून या स्मारकासमोर मोठमोठे खड्डे पडले आहेत ते स्मारकाच्या अगदी जवळ असून अनेक आवजड आणि इतर वाहनांची स्मारकासमोरील रस्त्यावरून वाहतूक सुरू असते., त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. तसेच, या खड्ड्यामुळे दगड उडून स्मारकला लागू शकतो. यामुळे सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो, म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील .खड्डे त्वरीत बजाविण्यात येऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा 29 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ लोकशाही पद्धतीने उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना संविधान युवा मंचतर्फे देण्यात आले होते.
त्यानुसार आज जाहीर उपोषण करण्यात आले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन स्मारकासमोरील खड्ड्यांची पहाणी केली व येत्या 6 ऑक्टोबरपर्यंत खड्ड्यांचे काम पूर्ण करण्याचे पत्र दिले. त्यानंतर उपोषण सोडण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अकील सेठ, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, विलास म्हस्के, सुनील गायकवाड, बाबा त्रिभुवन, कसबे, संविधान युवा मंच' चे पदाधिकारी जीवन पठारे, श्रीकांत जाधव, बाळासाहेब त्रिभुवन, लहानु त्रिभुवन,वाल्मीक त्रिभुवन, अंकुश त्रिभुवन शरद फुलारे आदी उपस्थित होते.
0 Comments