वैजापूर, ता.23 - आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त नगर परिषद वैजापूरच्यावतीने मंगळवारी (ता.23) शहरातील एकल महिलाचे शिबिर घेण्यात आले.नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबीराला एकल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुरुवातीला महिलांसाठी कार्य करणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महिला विकास खात्याकडून 16 जून 2026 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार लवकरच शासन "एकल महिला"सक्षमीकरण धोरण आखणार आहे. धोंडीरामसिंह राजपूत यांनी महिलांच्या समस्या व प्रश्नांवर मार्गदर्शन केले. एकल महिलांची समाजात व विविध कार्यालयात होणारी अडवणूक थांबावी, त्यांना गरजेची विविध प्रमाणपत्रे मिळावी, समाजात त्याचा अपमान थांबावा, त्यांना समाजाने व शासनाने सन्मानाने वागवावे, त्या स्वावलंबी व्हाव्यात व सक्षम व्हाव्यात म्हणून सर्व थरावर सर्वंकष प्रयत्न व्हावे असे प्रतिपादन राजपूत यांनी केले
आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन शिबिरात महिलांना मार्गदर्शन करताना धोंडीरामसिंह राजपूत
याप्रसंगी पालिकेचे उपमुख्याधिकारी साठे, महिला बचत गट समनवयक दिवाकर त्रिभुवन, सहाय्यक सुमन काकडे, जगदिश पहाडी, अंगणवाडी सेविका मनीषा चव्हाण, निर्मला बोरगे यांच्यासह शहरातील शंभरावर एकल महिला या शिबिरात उपस्थित होत्या. या सर्वांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
0 Comments