मुंबई, ता. 01 - अतिवृष्टी व महापुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून घरांमधील साहित्य, कागदपत्रे वाहून गेली आहेत.पिके अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे आपत्ती बाधितांना तत्काळ मदत देताना 'ई - केवायसी' ची अट रद्द करण्यात आली आहे.
पंतप्रधान किसन सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या 'ॲग्रीस्टॅक' वर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे आहे. त्या माहितीचा उपयोग करून बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
मराठवाडा आणि सोलापुरात गावेच्या गावे पाण्याखाली गेली आहेत.सर्वकाही पुरात वाहून गेले आहे.त्यामुळे बाधित शेतकरी व लोकांकडे कसलेही पुरावे शिल्लक राहिले नाहीत. तसेच अशा अडचणीच्या काळात त्यांच्याकडे पुरावे मागून ई केवायसी करणे योग्य नाही.त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे.त्याचप्रकारे अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची सर्व माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
0 Comments