महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत ज्येष्ट नागरिकांचा सन्मान ...
वैजापूर ता.01- शहरातील दत्त मंदिर परिसरातील दत्तगिरी आश्रम कमान ते समाधी मंदिर या रस्त्याच्या कामासाठी 35 लक्ष रुपयांचा निधी आ.रमेश पाटील बोरणारे यांनी शासनाकडून मंजूर करून दिला असून या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन बुधवारी (ता.01) श्रीक्षेत्र सराला बेटचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.1ऑक्टोबर या जेष्ठ नागरीक दिनानिमित्त शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानही यावेळी महाराजांच्या हस्ते करण्यात आला.
समाजातील जेष्ठ नागरिक हे कुटुंब व समाजाचे खरे आधारस्तंभ असतात. त्यांच्याकडे अनुभव संपन्नता व प्रचंड विधायक कार्यऊर्जा असते. जेष्ठ नागरिक हा देशाचा अमूल्य ठेवा असून त्यांचा आदर्श आजच्या तरुणवर्गाने घ्यावा व जेष्ठ व्यक्तींचा आदर सन्मान करावा असे वक्तव्य महंत रामगिरी महाराज यांनी ब्रह्मलिन दत्तगिरी महाराज आश्रमात जेष्ठ नागरिकांचा सन्मान करतांना केले. महाराज पुढे म्हणाले की, जेष्ठ नागरिक समाजाची खरी ऊर्जा असते, त्यांची ऊर्जा प्रेरणादायी असते. यानिमित्त त्यांच्याहस्ते स्वामी दत्तगिरी आश्रम कमान ते समाधी मंदिर रस्त्याचे भूमिपूजन ही करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी आ.रमेश पाटील बोरणारे यांनी शासनाकडून 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी महाराजांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिक पोपटराव भोसले, सोन्याबापू गावडे, बाबुराव वाणी, धोंडीरामसिंह राजपूत, अविनाश खांबेकर, दाणे पाटील, शेटे पाटील या जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान, डॉ .राजीव डोंगरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, संजय बोरणारे, संदीप संदीप बोर्डे,व दत्तगिरी आश्रमचे सर्व सेवेकरी, जेष्ठ नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments