वैजापूर, ता. 31 - वैजापूर तालुक्यातील मौजे कापूसवाडगाव येथे 90 लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी (ता .31) आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले.
तालुक्यातील लाडगाव ते कापूसवाडगाव डांबरीकरण भूमिपूजन 40 लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम भूमिपूजन 25 लाख रुपये, तांडा धनगर वस्ती सिमेंट रस्ता भूमिपूजन 15 लाख रुपये व कापूसवाडगाव ते पाट रस्ता खडीकरण 10 लाख रुपये अशा एकूण 90 लाख रुपये निधीच्या कामासाठी आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी शासनाकडून निधी मंजूर करून घेतला होता. या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार बोरणारे यांच्याहस्ते आज उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटी जगताप, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास आबा सुरासे, युवासेना तालुका समन्वयक गणेश पाटील निकोले, प्रशांत पाटील शिंदे, विभागप्रमुख नानासाहेब पातील थोरात, उपविभागप्रमुख सुनील कारभार, ॲड प्रदीप चंदणे, दादाभाऊ मोईन, महेश पाटील बुणगे, विलास आबा थोरात, काशिनाथ पाटील बारसे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, व्हाईस चेअरमन व गावकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments