वैजापूर ता.30 - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त वैजापूर  येथे काढण्यात आलेल्या "राष्ट्रीय एकात्मता दौड" मध्ये वैजापूर शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रीय एकात्मता, बंधुता व अखंडतेचे दर्शन घडवून सरदार वल्लभभाई  पटेल यांना अभिवादन केले. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून  'एकात्मता दौड' ला सुरुवात झाली. माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, संदीप ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी या दौडला ध्वज दाखविला. जवळपास एक कि.मी. दौड झाल्यावर या ठिकाणी धोंडीराम राजपूत यांनी राष्ट्रीय एकात्मता प्रतिज्ञा दिली व राष्ट्रगीताने समारोप झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी व भाजपचे दामोदर पारीक यांनी पुढील महिन्यापासून विविध समाजिक व राष्ट्रीय उपक्रम घेऊन कार्यक्रम राबविण्यात येतील असे विशद केले. 
या राष्ट्रीय एकात्मता दौड मध्ये डॉ.दिनेश परदेशी, भाजप युवामोर्चाचे विशाल संचेती, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, संदीप ठोंबरे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कंगले, गौरव दौडे, महेश भालेराव, गणेश खैरे, निलेश पारख, राजेश गायकवाड, अनिता तांबे, सुरेश तांबे, भीमा साखरे, सोनू राजपूत, सचिन राऊत, साबेर शेख, सुरेखा बागुल, नीता पाटील, गिरीश चापानेरकर, शैलेश पोंदे, जवाहर कोठारी, गोकुळ भुजबळ, सुभाष गोमलाडू, ज्ञानेश्वर सिरसाट, वैशाली शेलार, किरण व्यवहारे यांच्यासह शहरातील सर्व थरातील नागरिक विद्यार्थी, शिक्षक व जेष्ठ नागरिक "रन फॉर युनिट"त सहभागी झाले होते,
पीएमश्री विद्यालयात "रन फॉर युनिटी"
येथील पालिकेच्या पीएमश्री विद्यालयात सरदार वस्ल्लभभाई पटेल यांच्या150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून शिक्षक वर्गाने एकतेची दौड केली. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी या राष्ट्रीय एकात्मता दौडला ध्वज दाखविला..पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत बिघोत राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका नीता पाटील यांनी ही दौड आयोजित केली होती.
याप्रसंगी सुभाष गोमलाडू, किशोर साळुंकर, काकासाहेब ढेपले, वैशाली शेलार, श्रीमती राजपूत, पंकजा भाकरे, बी.आर. कुमावत, जगदीश पाटील, खैरनार, श्री हरकल यांची उपस्थिती होती. 
 
0 Comments