पंचायत समितीमध्ये आठ जागा महिलांसाठी राखीव...
वैजापूर, ता.14 - वैजापूर तालुक्यातील पंचायत समित्यांच्या आठ गणांचे आरक्षण सोमवारी पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड व तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने काढण्यात आले. शालेय विद्यार्थिनीने चिट्ठी काढल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गणाचे आरक्षण जाहीर केले. तालुक्यातील 16 गणांपैकी आठ गणांमध्ये महिला सदस्य असणार आहेत.
तालुक्यातील आरक्षण पुढीलप्रमाणे
वाकला (अनुसूचित जमाती स्त्री)
पोखरी (सर्वसाधारण स्त्री)
मनूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
बोरसर (सर्वसाधारण स्त्री)
शिऊर (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री)
खंडाळा (सर्वसाधारण)
जरूळ (सर्वसाधारण)
सवंदगाव (अनुसूचित जाती स्त्री)
पालखेड (सर्वसाधारण)
लासूरगाव (सर्वसाधारण स्त्री)
घायगाव (सर्वसाधारण)
लाडगाव (सर्वसाधारण)
वांजरगाव (सर्वसाधारण स्त्री)
विरगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री)
महालगाव (अनुसूचित जाती)
नागमठाण (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
0 Comments