news today, 'एक हात मदतीचा' गुरुवारपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार मदत

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची अभिनव संकल्पना ...

छत्रपती संभाजीनगर, दि.१४ (जिमाका) - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अभिनव संकल्पनेतून सामाजिक दायित्वाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील २६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना  शासनाच्या विविध उपक्रमांचा आणि योजनांचा लाभ देण्यात येत आहे. तसेच दिवाळीच्या निमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांसाठी  विविध सामाजिक संस्थेच्या सहभागातून जिल्हा प्रशासनाने ‘एक हात मदतीचा’ द्वारे कुटुंबियांना मदतीचे किट देण्यात येणार आहे.




हा उपक्रम राबविणासाठी कार्यक्रम याप्रमाणे ....

गुरुवार दि.१६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे, छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री या तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात येईल.
गुरुवार दि.१६ रोजी दुपारी ३ वाजता सिल्लोड येथे सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात येईल.
शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी १० वाजता कन्नड येथे कन्नड, खुलताबाद तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात येईल.
शुक्रवार दि.१७ रोजी दुपारी ३ वाजता लासूर स्टेशन येथे क, 
लागंगापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात येईल.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवाड्यानिमित्त तालुकास्तरावर केले. या सर्वेक्षणातून मदतीची गरज असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची निवड करण्यात आली. शासकीय योजनेच्या लाभाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करुन एक किट तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण २६७ कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये ३९,शेतकरी कुटुंब, फुलंब्रीमध्ये ३० पैठण तालुक्याचे ४० सिल्लोड येथील ६२ सोयगाव येथील १२ कन्नड येथील ३६ खुलताबाद येथील ४ शेतकरी आणि वैजापूर येथील १० गंगापूर येथील ३४ तसेच इतर उर्वरित सदस्य यांना मदत करण्यात येणा एक का आहे.

Post a Comment

0 Comments