news today, पदवीधर मतदार नोंदणी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची बैठक

वैजापूर, ता.30 - छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार नोंदणी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या अनुषंगाने वैजापूर दक्षिण मंडळाची संघटनात्मक बैठक वैजापूर शहरातील संपर्क कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.

या बैठकीत मार्गदर्शन करताना संजय खांबायते यांनी केंद्र व राज्य सरकारची विकासकामे, भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे आणि राष्ट्रनिष्ठ विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले. माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन त्यांनी केले. बैठकीत पदवीधर नोंदणी, संघटन बळकटी व जनसंपर्क मोहिमेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष पाटील काळे, 
दशरथ बनकर, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, जिल्हा सचिव मंजाहरी गाढे, प्रभाकर बारसे, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कंगले, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विशाल संचेती, तालुकाध्यक्ष संदीप ठोंबरे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक सौरभ कुलकर्णी, शहराध्यक्ष गोकुळ भुजबळ, गौरव दौडे, सुरेश तांबे, प्रेम राजपूत, विनोदशेठ राजपुत, शैलेश पोंदे, प्रमोद सोमवंशी, दादा मापारी, प्रविण सोमवंशी, प्रविण तांबे, बजरंग मगर,शैलेश चव्हाण,राजेश गायकवाड, दादा मोईन, सोनु राजपूत, दामोदर पारिक, प्रविण सावंत, सागर राजपूत, दादासाहेब मापारी, भिमाशंकर साखरे, करण जेजुरकर, फिरोज पठाण, बाळासाहेब गायकवाड, पोपट पठाडे, नारायण खिल्लारी, गिरीश चापानेरकर, शांताराम दुशिंग, चांगदेव उघडे, दादासाहेब गायकवाड,अनिल साठे,अमोल बुट्टे, कुणाल चव्हाण,महेश भालेराव, सचिन साळूंके, दिपक पवार, अशोक निकम, बाबासाहेब तुपे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्यासांख्येणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments